प्रसादाचे आमिष दाखवत ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

स्त्री अत्याचाराच्या घटना राज्यात अधिकच वाढत चालल्या आहे. नराधमांना कुठल्याही प्रकारचे कायद्याचे आणि पोलिसांचे भय राहिलेले नसल्याचे चित्र आहे. त्यात लहान मुलींपासून तर वयोवृद्ध महिलानापर्यंत सर्वच असुरक्षिततेच्या सावटाखाली आहे का? हा सवाल आहे. त्यातच भरीसभर म्हणून कल्याणमध्ये एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. एका नराधमाने प्रसादाचे आमिष दाखवत घरी बोलावत ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना समोर आली. ही संतापजनक घटना कल्याण पूर्व परिसरात घडली आहे. रामलखन असे या नराधामचे नाव असून कोळशेवाडी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सात वर्षीय मुलगी आपल्या घरासमोर खेळत होती. यावेळी शेजारी राहणारा रामलखन मुलीजवळ आला. रामलखन त्याच परिसरात राहणारा असल्याने मुलगी रामलखन याला ओळखत होती. ओळखीचा फायदा घेत रामलखने मुलीला मी तुला प्रसाद खायला देतो असे सांगत घरी नेले. घरात नेऊन मुलीवर त्याने अत्याचार केला.

या घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गुन्हा दाखल करत नराधमाला अटक केली आहे. या घटनेमुळे मुलगी घाबरली तिने घडलेला प्रकार घरी कुटुंबीयांना सांगितला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. आरोपी व्यक्ती हमालीचे काम करतो. तो घरात एकटाच राहतो. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी रामलखनला अटक केली आहे. पोलिसांनी आज त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने रामलखन याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.