बापरे विमानाला भीषण आग, 350 जण.. (व्हिडीओ)

0

टोकियो, लोकशाही न्यूज नेटवर्क 

धावपट्टीवरच जपान एअरलाइन्सच्या विमानाला आग लागल्याची घटना घडली.  जपान एअरलाइन्सच्या विमानाला हानेडा विमानतळाच्या धावपट्टीवर आग लागली. विमानातील 350 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.  या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  विमान आणि जपान तटरक्षक दलाच्या विमानात झालेल्या टक्करमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. टोकियो अग्निशमन विभागाने ही माहिती दिली. वाहतूक आणि पर्यटन मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगितले. तसेच या घटनेचे  स्थानिक मीडियाने व्हिडीओ जारी केले आहेत.

https://x.com/ANI/status/1742126206169108925?s=20

दरम्यान विमानाला आग लागली तेव्हा विमानात 350 लोक होते. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मोठी दुर्घटना टळली. सध्या विमानाला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

https://x.com/aviationbrk/status/1742115021595836808?s=20

Leave A Reply

Your email address will not be published.