संस्थाचालकाची १० लाखांची मागणी; कर्मचाऱ्याची आत्महत्या… संस्थाचालकासह 11 जणांवर गुन्हा दाखल…

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

अमळनेर तालुक्यातील शिरुड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूड येथील शाळेच्या कर्मचाऱ्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी शाळेच्या संस्थाचालकांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, २०१३ मध्ये तुषार भाऊराव देवरे (रा.सारबेटे) ग्रामविकास शिक्षण मंडळ मुडी या संस्थेच्या सारबेटे येथील सार्वजनिक विद्यालयात अनुकंपा तत्वावर नोकरीला लागले होते. नंतर त्यांची संस्थेच्या शिरुड येथील हायस्कूलमध्ये बदली करण्यात आली. सदर बदली रद्द करण्यासाठी संस्थेच्या संचालकांनी १० लाख रुपये देणगी मागितली. याप्रकरणी तुषार याने दोन लाख रुपये भरले होते. तरीही संचालकांनी उर्वरित पैश्यांसाठी त्यांच्याकडे तगादा लावला. त्याचा बरोबर इतर दोन कर्मचाऱ्यांनी पैशांसाठी तगादा लावला. या सर्वांना कंटाळून तुषार याने दि. ११ रोजी रेल्वेखाली आत्महत्या केली.

तुषार याने आत्महत्येस संचालक जबाबदार असल्याबाबत तीन चिठ्या लिहून ठेवल्या होत्या. याबाबत तुषार याची पत्नी प्रतीक्षा हिच्या फिर्यादीवरून ११ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संचालक रमेश विनायक पाटील, सचिव सुनील पंढरीनाथ पाटील (नाशिक), प्र. अध्यक्ष पंजाबराव पांडुरंग पाटील, संचालक जयवंतराव अमृतराव पाटील (शिरुड), कमलाकर विनेश पाटील, दीपक चंदन पाटील, शालेय समिती सदस्य शशिकांत रघुनाथ पाटील, कर्मचारी दिनेश वसंत पाटील, निवृत्त मुख्याध्यापक अनिल लोटन पाटील, सचिन संजीव काटे, शरद दयाराम शिंदे. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संचालक कमलाकर पाटील यांनीं म्हंटले की, तुषार यास संस्थेने कायम केले होते. त्याचा पगार नियमित निघत होता. तरीही तो अनियमित येत होता. त्याने केलेले आरोप खोटे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.