सौ. र.ना.देशमुख महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न…

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

दिवाळी निमित्त बहुसंख्य विद्यार्थी गावी आलेले असल्या निमित्ताने भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी भडगांव महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी मेळाव्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एन. गायकवाड, संघाचे अध्यक्ष गणेश परदेशी, संचालक सुयोग जैन,संचालिका सौ. मनीषा पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. 1984 ते 2021 पर्यंत या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, शिरपूर येथे नोकरी व्यवसायानिमित्त गेलेले विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित होते. सर्वांनी गत काळातील आपल्या कडू गोड आठवणींना उजाळा दिला व त्या काळातील शिक्षकांची आठवण काढली. शिव व्याख्याता रवींद्र पाटील या माजी विद्यार्थ्यांनी वेध रायगडाचा हे पुस्तक लिहिल्याबद्दल व पी एस.आय.मुस्तफा मिर्झा यांचे कौन बनेगा करोडपती (मराठी) यात निवड झाल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व उपस्थितांनी एकमेकांचा परिचय करून घेतला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जुने मित्र एकमेकांस भेटून आनंद व्यक्त करीत होते. महाविद्यालयाचा आम्हा सर्वांना घडविण्यात सिंहाचा वाटा आहे असे मनोगत सर्वांनी व्यक्त केले व महाविद्यालयाच्या विकासासाठी व आजी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्याचे कार्यकारिणी सदस्यांनी घोषित केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न होत असलेल्या एरंडोल विभागीय खो-खो स्पर्धेचा देखील आस्वाद घेतला. मेळाव्याचे सूत्रसंचालन नरेंद्र पाटील यांनी तर आभार राजेंद्र मोरे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.