पोलिसाच्या घरातून चोरट्यांनी केले ९ लाख लंपास…

0

 

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यातील खेडी खुर्द येथून चोरट्यांनी चक्क सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक डी.पी.पाटील यांच्या बंद घरातून नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. यामध्ये सोने, चांदी व रोख रक्कमेचा समावेश आहे.

दि. २८ रोजी गावाहून परतले असता त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे समजले. त्यानंतर मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी पोहचवून पाहणी करून पंचनामा करण्यात आला. ठसे तज्ज्ञ व श्वानपथक मागवून परिसर पिंजून काढण्यात आला. निवृत्त पोलीस अधिक्षकाकडे झालेल्या या चोरीमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.