सीडीएस बिपिन रावत यांना श्रद्धांजली

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी व अन्य अधिकारी यांचे हेलिकॉप्टर अपघातात अत्यंत दुर्दैवी निधन झाले.   खोपट कार्यालयात सदरच्या दुर्घटनेत दिवंगत पावलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना भाजपा आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनानुसार व दत्तात्रय आपटे  यांच्या सहकार्यातुन श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, विलास साठे, दत्तात्रय आपटे, राम ठाकूर, विक्रम भोईर, किरण जोशी, शशिकांत कुर्ले, तृप्ती पाटील, राधा शर्मा, शितल कारंडे आदींच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.