शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपाहार्य वक्तव्य केल्याने काल संपूर्ण महाराष्ट्रासह जळगावात देखील तीव्र पडसाद उमटले होते. तसेच राणेंच्या अटकेनंतर जमावबंदीचे उल्लंघन करून आंदोलन करतांना भाजप कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्ह्यात शिवसैनिकांनी आक्रमक होत आंदोलन केले. आंदोलनाच्या दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजप कार्यालयात शिरले. त्यांनी तेथे कोंबड्या फेकून उपस्थितांना धक्काबुक्की केली. या प्रकाराचा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी निषेध करून गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता.

यानंतर रात्री शहर पोलीस स्थानकात शिवसेनेच्या २५ पदाधिकार्‍यांवर जमावबंदीचे उल्लंघन आणि धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात महापौर आणि उपमहापौरांसह अन्य पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.