ना. नारायण राणे यांना नासिक पोलिसांची नोटीस

0

सायबर पोलीस स्थानकात हजर राहण्याची सूचना ; अन्यथा अटक

राणे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभर सेना भाजपा कार्यकात्यांमध्ये ’राडा’ झाला. शिवसेना भाजपचे कार्यकर्ते रस्त्यांवर परस्परांना भिडले असताना राज्य सरकारने राणे यांना अटक केली. आणि कोर्टाने ११ तासात अटी शर्ती ठेवत जामिनावर सुटका देखील केली. तरीही मंत्री राणे यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.

नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना   नोटीस बजावली आहे. दोन सप्टेंबर रोजी हजर राहण्याची सूचना त्यांना देण्यात आली आहे. हजर न राहिल्यास अटक करण्यात येईल, असेही नाशिक पोलिसांनी सांगितलेय.

तपास आधिकारी अनंद वाघ यांनी ना. नारायण राणे यांना नोटीस बजावली. गुरुवार दोन सप्टेंबर रोजी ना. नारायण राणे यांना आपली बाजू मांडण्यासाठी नाशिक सायबर पोलिस स्थानकात हजर राहा, असं या नोटीसीत म्हटले आहे. या नोटीस विरोधात नारायण राणे यांनी लगेचच हायकोर्टात धाव घेतली आहे. नाशिकशिवाय, जळगाव, पुणे, ठाणे आणि औरंगाबाद मध्येही राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंततर राज्यात शिवसैनिकांचा संताप झाला होता. या प्रकरणी नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी नाशिक पोलिसाचं पथक त्यांना अटक करण्यासाठी रत्नागिरीला पोहचलं होतं. महाड पोलिसांनी राणे यांना अटक करुन कोर्टात हजर केलं होतं. यावेळी नाशिक पोलिसांनी राणे यांना हजर राहण्याचा समन्स दिला आहे. नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली.

या घटनेचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तीव्र पडसाद उमटले. पोलिसांनी राणे यांना महाड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुमारे सव्वा तासाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर झाला. मात्र, त्यांच्या अडचणी संपताना दिसत नाही

Leave A Reply

Your email address will not be published.