शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी 10 जानेवारीला

0

मुंबई ;- शिंदे गटाच्या १६ आमदार अपत्रता प्रकरणाचा अखेर मुहूर्त ठरला असून १० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहे.

शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पार पडली. गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर सुनावणी सुरू हो गयाती. दोन्ही गटाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर अंतिम टप्प्यातील सुनावणी 18 डिसेंबरपासून सलग तीन दिवस पार पडली. या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीपर्यंत द्यावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.

.

सुनावणीवेळी दोन्ही गटांच्या काही आमदारांची उलटतपासणी घेण्यात आली. त्याशिवाय दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात पुरावे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या वकिलांकडून सुनावणीत युक्तिवाद झाला.

त्यामुळे आता आमदार अपात्रताप्रकरणी निकाल 10 जानेवारीला जाहीर करण्यात येणार आहे. संध्याकाळी 4 वाजता हा निकाल विधानसभाध्यक्ष देणार आहेत. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.