खुनाच्या गुन्ह्यात ७३ दिवस उलटूनही आरोपी मोकाटच

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चाळीसगाव तालुक्यातील मौजे बोढरे शिवापूर वादग्रस्त बेकायदा जेबीएम सोलर कंपनीच्या जमिन खरेदी व्यवहारतील जमिनीच्या मोबदल्याची मागणी केल्यावरून मौजे बोढरे येथील  शेतकरी महिलेचा खुन केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यावर तब्बल ७३ दिवस उलटले तरी एकाही आरोपीला अटक झाली नसून दाखल गुन्ह्यातील सर्व आरोपी हे  मोकाटच फिरत असल्याचे उपोषकर्त्याचे म्हणणे आहे.

घातपाताने संशयास्पद मृत्यू झालेल्या सोलर प्रकल्प पिडीत शेतकरी महिला फिर्यादीची मावस सासू होती. मौजे बोढरे शिवारात मयत शेतकरी महिला हिचे पतीच्या नावे असलेल्या त्यांच्या १७ एकर जमिनेचे फक्त  ११ लाख रूपये मोबदला देऊन एजंटामार्फत जेबीएम सोलर कंपणीने जमिन स्वस्तात खरेदी करून घेतल्यानंतर पतीच्या बॅंक खात्यात टाकण्यात आलेले ११ लाख रूपये मधून चेकद्वारे आरोपींनी ९ लाख रूपये काढून घेतले होते. काढलेले पैसे व जमिनीच्या पुरेपूर मोबदल्याची मागणी मयत महिला आरोपींकडे करीत असतांना आरोपींकडून मयत महिलेला जिवेठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकी मिळाल्यानंतर अवघ्या चार दिवसाने महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असे पिडीताच्या जावयाने सांगितले.

चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला  ( गु.र.नं.३८७/२०२३ ) दि. २७/१०/२०२३  रोजी ९ आरोपींसह इतर  ४ अनोळखी व्यक्तींवर  खुनाचा गुन्हा झाला असून अद्याप एकही आरोपी अटकेत नसून सर्व आरोपी मोकाट फिरत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपीने फिर्यादीचे वकील भरत पांडुरंग चव्हाण यांच्या मोबाईलवर फोन करून फिर्यादीचे नाव घेत धमकावले, धमकी दिल्या बाबत  ग्रामीण पोलीस स्टेशनला  फिर्याद देखील दिली आहे.

सदर आरोपीकडून फिर्यादीच्या जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे फिर्यादीचे सांगणे आहे. तसेच सोलर प्रकल्प पिडीत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढत असलेले बोढरे गावचे राहीवाशी फिर्यादीचे मित्र  भिमराव जाधव हे फिर्यादीला मदत करता आहेत म्हणून अज्ञात गुंडांकडून आरोपी गुलाब राठोडने  भिमराव जाधव यांना देखील जिवेठार मारण्याची धमकी धमकी दिली आहे. याबाबत पोलिसात फिर्यादही दिली आहे. सदर आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून गावात व आजूबाजूच्या परिसरात मोकाट फिरत असतांना देखील पोलिसांकडून अटक होत नसल्याने आरोपीला कायद्याची भिती राहीलेली नाही. म्हणून पीडित कुटूंब तहसिल कार्यालयासमोर आजपासून बेमुदत आमरण उपोषण करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.