राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बर्निंग ट्रकचा थरार

0

एरंडोल- एरंडोल – साड्यांचे गठ्ठे भरलेला आयशर ट्रक बुधवारी रात्री २ वाजेच्या सुमारास पेटल्याची घटना भावा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोल पिंपळकोठा दरम्यान घडली. सदर अपघात ग्रस्त ट्रक चालक मालकाकडे सुरत येथे गेल्याचे समजते याप्रकरणी एरंडोल पो. स्टे. ला गुरुवारी संध्याकाळपर्यंत कुठलीही नोंद नव्हती.

जीजे.१६/९९०२ या क्रमांकाचा आयशर ट्रक  साड्यांचे गट्टे भरून सुरत येथून नागपूर  जात होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर एरंडोल पासून जळगाव कडे सुमारे ७ ते ८ कि.मी. अंतरावर त्रिमूर्ती हॉटेल या ढाब्या जवळ हा ट्रक अचानक पेटला. हे थरार पाहून हायवेवरील वाहतूक काहीवेळ ठप्प झाल्याचे कळते. हा ट्रक  पेटल्यामागचे कारण समजू शकले नाही. हा ट्रक पेटला की पेटविला याबाबत उलट सुलट चर्चा आहे.  थंडीच्या दिवसात हे वाहन पेटल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.