बालवयापासून जोपासली शिक्षणाची जिद्द – ज्ञानंदा वाणी !

0

 जळगाव- तळेगाव -दाभाडे येथील रहिवासी  असलेल्या डॉ नालंदा वाणी व ज्ञानेश्वर गुलाबचंद वाणी ह्याची कन्या कु ज्ञानंदा वाणी हि इंजिनीअरच्या  शेवटच्या वर्षाला असून ती पीसीसिओई ह्या महाविद्यालयांत ई अँन्ट टिसि या शाखेत बीई चे शिक्षण घेत होती तिला नुकतेच भारत सरकार नवी दिल्ली ह्याचे कॉपी राईट मिळाले असून  unstuck wheels quick drive या शीर्षकांतर्गत मांडलेल्या संकल्पनेनुसार कु ज्ञानंदा हिला हे सरकारमान्य अधिकार मिळाले आहेत.

ज्ञानदा हि बालवयापासूनच अतिशय हुशार व चंचल  होती शाळांत परीक्षेमध्ये तिने उत्कृष्टपणे  यश प्राप्त करून तिने  ९२%गुण  मिळवले आणि बारावीत  असताना ७८% गुण प्राप्त केले होते विज्ञान शाखेत ती उत्तीर्ण झाली पुढे तिने पीसीसीईओ पुणे ह्या अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स  टेलिकम्युनिकेशन या शाखेत  प्रवेश घेतला नेहमी ती  विविध स्पर्धामध्ये सहभाग घेऊन  ज्ञानदाने एक प्रकल्पाची संकल्पना स्वतःहा तयार करून ती  सादर केली होती  चिखलात चारचाकी वाहनांमुळे वर्दळीच्या  ठिकाणी  नेहमी ट्रॅफिक होते इंधन आणि वेळही वाया जात असतो ह्यावर उपाय म्हणून तिने  unstuck wheels quick drive या नावाची संकल्पना  तयार करून ती भारतीय कॉपीराईट कार्यलयाला ती पाठविण्यात आली त्यावर कार्यलयाने कोणत्याही प्रकारच्या त्रुटी  न काढता ज्ञानदाला या संकल्पनेचे अधिकार देण्यात आले.

ह्या प्रकल्पासाठी तिच्या वर्गमैत्रिणीचे कु सायली दगडे हिची मदत तिला  मिळाली आणि ज्ञानदाची आई डॉ नालंदा वाणी ह्यांनी तिला मार्गदर्शन केले  वडिल ज्ञानेश्वर वाणी तिला या प्रकल्पसाठी नेहमी  प्रोत्साहन दिले या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत असून आजी अंजली वाणी (नाशिक) शकुंतला वाणी मामा-निलेश वाणी काका निवृत्ती वाणी काकू यांनी तिचे अभिनंदन केले तर धाकटी बहिनीने कु वेदा वाणी बहिणीच्या या यशाने तिला आनंद झाला असे.

Leave A Reply

Your email address will not be published.