बोदवड तालुक्यात नुकसान भरपाईपोटी पहिल्या टप्प्यात 5 कोटीचा निधी

0

बोदवड – तालुक्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीमालाची नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून तालुक्यातील 52 गावांसाठी प्रथम हप्ता म्हणून 5 कोटी 80 लाख 49 हजार 404 रुपये अनुदान तहसिल कार्यालयात जमा झाले असून सदरचे अनुदान दि.26 नोव्हेंबर रोजी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.

शेतकर्‍यांना कोरडवाहू पिकासाठी प्रती हेक्टरी आठ हजार रुपये व बागायतीसाठी जास्तीत जास्त 18 हजार रुपये प्रती हेक्टरी निधी मंजूर करण्यात आला आहे.

यात बोदवड तालुक्यातील 18 हजार 361 हेक्टर क्षेत्रावरील शेतमालाचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यात कापूस,मका,सोयाबीन,ज्वारी बाजरी व फळवर्गीय पिकांचा समावेश आहे.तर पिक विमा काढलेल्या शेतकर्‍यांना लवकर पिक विमा नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.