पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा : उदय वाघ

0

यांची चटका लावणारी अकाली एक्झिट!

 

काही माणसं सोबत असली तर तर त्यांची महती आपणास कळत नाही. मात्र, ती अकाली एक्झिट घेतात तेव्हा त्यांची उणीव भरुन निघत नाही. अशी माणसं चटका लावून जातात. आठवणींना श्रीमंत करुन जातात. उदयबापू वाघ आज अश्याच माणसात शामिल झाले आहेत.

जगी ज्यात दुःखे भरती, दोष ना कुणाचा. पराधिन आहे जगती, पुत्र मानवाचा! 

या ओळी काळाच्या कसोटीवर आज पुन्हा एकदा खर्‍या ठरणारी घटना जिल्ह्यात घडली. अमळनेर तालूक्याचा ढाण्या वाघ सर्वसमान्य कार्यकर्त्यांना जिवाला जिव देणारा सच्चा नेता बापू अर्थात ऊदय वाघ यांचे आज दि28 रोजी सकाळी 10 वा ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचे बातमी वार्‍यासारखी तालूक्यासह जिल्ह्यात पसरताच त्यांचा चहात्या वर्गाला प्रचंड धक्का बसला. एक ऊदयोन्मूख नेता काळाच्या पडद्याआड गेला.

नयनी त्यांच्या सदैव वसे विकासाचेच चित्र. कर्तृत्वाने असा तळपला, डांगर गावचा सुपुत्र.

तालुक्यातील डांगर गावातील सुपुत्र उदय भिकनराव वाघ यांची सरपंच पदापासून ते जिल्हाध्यक्ष पदा पर्यंतचा कार्य पाहाता त्याचा आलेख आजवर उंचावत आहे. सरपंच असतांना एकाच वेळी डांगर गावात 42 घरकुलांचे बांधकामपूर्ण करून गावक-यांमध्ये उत्साह निर्माण केला होता. त्यांच्या नयनी सदैव परीसर विकासाचेच चित्र होते. याच दरम्यान पदवीपर्यंत शिक्षण यांनी प्रताप महाविद्यालयात पूर्ण केले.वेळोवेळी पक्षाच्या माध्यमातून केलेल्या कामाची पोचपावती वाघ कुटुंबाला मिळाली आहे. यामुळे गावसरपंच ते एवढ्यामोठ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष पर्यंतचा प्रवास उदय वाघांचा खडतर आणि बिकट प्रवास त्यांनी केला आहे.

आधी केले मग सांगितले, पत्नीस त्यांनी आमदार केले.

त्यांनी स्त्री पुरुष समानता निव्वळ सांगितली नाही तर प्रत्यक्षात आणली. पत्नीला राजकारणात सक्रिय सोबत केली. आमदारकीपर्यंत नेले.

यात वेळोवेळी त्यांच्या पत्नी विधान परिषदेच्या आमदार सौ.स्मिता वाघ यांनी त्यांना भक्कम साथ दिली. यात सुरवातीच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये कार्यकर्ता या दशेपासून त्यांनी स्वता: भोवती जी शिस्त बांधून घेतली त्या आधारावर आज त्यांनी जिल्ह्यावर पकड भक्कम ठेऊन सर्वत्र भाजपामय स्थिती निर्माण केली होती.

सर्वांना घेवून सोबत, संघटन मजबूत केले. पक्षाचे जिल्ह्यात कार्य, गगनावरती नेले.

पक्षात काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन चालणे संघटन मजबूत करणे आणि पक्ष वाढवणे असे निस्वार्थीपने काम करत असतांना पक्षाने त्यांच्या कार्याची नोंद घेत त्यांना जिल्हा सरचिटणीसपदी विराजमान केले होते. याच आधारावर त्यांना जिल्हा बँकेवर, जिल्हा दूध फेडरेशन वर संचालक म्हणून निवडून आणले होते. या सर्व कामांमध्ये यशस्वी ठरलेल्या उदय वाघांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा गोवा प्रभारी म्हणून पक्षाने निवड केली होती. यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.यातच केंद्रात व राज्यात विरोधी सत्ता असताना लोकहिताच्या प्रश्नांवर आंदोलन, रास्ता रोको असे करत जिल्हा या काळातही त्यांनी संघटन कौशल्याच्या व त्यातून जमवलेल्या कार्यकर्त्यांच्या मजबूत फळीच्या जोरावर बळकट ठेवला.

घेतला तो सोडला नाही त्यांनी वसा, कार्यकर्तृत्वाचा उमटविला ठसा.

यांनतर केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाच्या आलेल्या सत्तेत जिल्ह्यातून त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले. आपल्या कामाचा त्यांनी ठसाच उमटवला. याच जोरावर त्यांना पक्षाने दुस-यांदा जिल्हाध्यक्ष पदी निवड केली. 2017 मध्ये झालेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसह ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सत्ता एक हाती आणण्यात त्यांना यश मिळाले. निवडणुकी बाबत योग्य नियोजन आणि बूथ रचणे संदर्भात उदय वाघांची आखणी योग्य ठरल्याने राज्यात पहिल्यांदा जिल्हा बूथरचनेत द्वितीय क्रमांकाने आला.जिल्हा भाजपामय करतांना पार्लमेंट ते पंचायत अशी सत्ता त्यांचे कार्यकाळात होती हे विशेष याच काळात अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत बहुमताने भाजपमय पॅनल निवडन आणण्यात हि यशस्वी ठरत आजवर त्यांनी सभापती पदाची धुरा भक्कमपणे आपल्या हाती ठेवत कृ.उ.बा. मध्ये विकासकामांची घौडदौड सुरु ठेवली आहे.

आधुनिकतेचा ऐसा,बसविला मेळ.भूमिपुत्र म्हणून, केली परत फेड

आधुनिकीकरणाकडे वाटचाल करीत असतांना स्वतः शेतकरी पुत्र असल्याची जाणीव ठेवत कृ.उ.बा. मध्ये शेतकर्‍यांची अनेक प्रश्न सोडवले आहे. न भूतो न भविष्यती असे जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील दिगज्जांचे प्रवेश भारतीय जनता पक्षात करून घेतले. अमळनेर तालुक्यावरील आपली पकड घट्ट असून जिल्ह्यातही संघटनेचा गड डगमगू दिला नाही. मातब्बर बाह्य विरोधकांसह अतर्गत विरोधकांनाही त्यांनी शांत केले आहे. उदय वाघ याच्या कार्यकाळ जळगाव मनपात ना. गिरिष महाजन व ईतर नेत्यांच्या सहकार्याने इतिहास रचून सर्वाधिक भाजपाची जागा पटकावल्या व एक हाती सत्ता मिळवली. अमळनेर तालुक्याला स्मिताताईंच्या माध्यमातून दुसरा आमदार मिळाल्यानंतर भाजपा मधील सच्चा कार्यकर्ता म्हणून सत्तेचा फायदा घेत उदय वाघ व आ.स्मिता वाघ यांनी तालुक्याचा विकासाचा विडा उचलल्याने तालुका प्रगतीच्या दिशेने चालला आहे. अमळनेर तालुक्याला संजीवनी ठरणारा पाडळसे प्रकल्प होणे गरजेचे आहे. मात्र केंद्रीय जल आयोगाच्या मान्यते अभावी प्रकल्प रखडला आहे.

आयुष्य जरी ध्येयाला वाहिले, एक स्वप्न मात्र उधूरे राहिले.

पाडळसे प्रकल्पाची किंमत 2200 कोटी पर्यंत गेली असल्याने एवढ्या प्रमाणात पैसा उपलब्ध करायचा असेल तर हा प्रकल्प केंद्राच्या प्रधानमंत्री सिंचन योजना किंवा बळीराजा योजनेत समाविष्ट करणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी केंद्रीय जल आयोगाची मान्यता आता मिळाली होती. यासाठी वाघ दाम्पत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भाजपचे राष्टीय अध्यक्ष अमित शहा,केंद्रीय जलसंपदामंत्री नितीनजी गडकरी, महाराष्ट- प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून भेटीगाठी घेतल्या व यासाठी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. राजकीय सतेचा वापर कसा करावा एवढे चाणाक्ष दोघे पती-पत्नी होतेच,मात्र त्यांचे हे स्वप्न अधूरे राहिले.

त्यांचा सामाजिक कळवळा,समाजाप्रती आदर,सहानुभूती असल्याने स्वखर्च करून जनतेला समाधानी करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला होता. उदय वाघ यांच्या दृष्टीने एका दशकापासून भाजप पक्षाला दमदार नेतृत्व करणारे जिल्हाध्यक्ष मिळाले . तर उदय वाघांच्या दर्जेदार वक्तृत्व शैली व कुशल संघटनमूळे भविष्यात पक्ष त्यांच्यावर मोठ्या जबाबदार्‍या देऊ शकतो.अशी अपेक्षा त्यांच्य समर्थक कार्यकर्त्यांना होती राजकीय यशाची पताका वाघ दांपत्य तालूक्यात फडकवून यशाची शिखरे गाडत असतांनाच आमचे सन्मित्र व जिवा भावाचे जिवलग स्नेही सच्चा नेता हाडाचा पत्रकार असलेल्या ऊदय बापूंनी अशी एक्झीट घेतली हे सत्य अजूनही मनाला पटत नाही मात्र ते सत्य असून एका सच्चा दिलदार मित्र अभ्यासू राजकारणी निधड्या छातीचा खंबीर यूवा नेत्याला देवाने आपल्याकडे बोलावून घेतले.

तुमच्या समृतींच्या करु साठवणी, आता उरल्या फक्त आठवणी. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हि प्रभू चरणी प्रार्थना ओम शांती ! शांती शांती! शांती!

राजेंद्र पोतदार

पत्रकार, अमळनेर 8412021144

Leave A Reply

Your email address will not be published.