महिलांना ५०% आरक्षणामुळे चुल- मुलपर्यंत सिमित न राहता घरा बाहेर पडावे- काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पवार

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चाळीसगाव शहरात नुकताच शहर महिला काँग्रेसतर्फे महिला अध्यक्षा अर्चनाताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली दि. 17 डिसेंबर शुक्रवार रोजी भव्य महिला मेळावा जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत येथील सिंधी मंगल कार्यालयात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा महिला कांग्रेस अध्यक्षा सुलोचनाताई वाघ होत्या. यावेळी पोळ यांनी वर्षभरात पूरग्रस्तांना मदत असो की, महागाई विरोधात आंदोलन काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अपशब्द वापरणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन गोर गरिबांची जाणीव ते आक्रमक महिला म्हणून कार्य करणाऱ्या पोळ यांचे कौतुक करण्यात येवून जळगाव जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप पवार यांनी येणारा काळ महिलांचा आहे.

काँग्रेसने पन्नास टक्के महिलांना आरक्षण देवून पुढे येण्याची संधी दिली, त्यामुळे महिलांनी चुल आणि मुलपर्यंत सिमित न राहता घरा बाहेर पडावे, काँग्रेसचे नेतृत्व स्वर्गीय इंदिराजी गांधी सोनियाजी गांधी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले, तर रावेर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील या महिला मेळाव्यात इतके भारावून गेले. तर त्यांनी जाहीर करून टाकले की, पुढील होणारे फैजपूर येथील काँगेस अधिवेशनात काँग्रेसच्या महिला नेत्या प्रियांका गांधी यांचा सत्काराचा मान चाळीसगाव येथील महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अर्चनाताई पोळ यांना असेन.

मेळाव्यास सुरवातीला तामिळनाडू येथे विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेले. सीडीएस प्रमुख बिपीन रावतजी व त्यांच्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी महिला शहर अध्यक्षा अर्चना ताई यांच्या कार्याचे कौतुक करत अर्चना ताई माझी मुलगी असून मला त्यांच्या कार्यावर गौरव असून तुमचे कार्य पाहता येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत 50 टक्के महिला या निवडून येणार अशी खात्री झाली.  असून मी व जिल्ह्यातील नेते मंडळी संपूर्ण ताकतीनिशी तुमच्या सोबत असून केव्हाही आवाज द्या मी व जिल्ह्यातील नेते मंडळी हजर असून तुमच्या पाठीशी आहेत अशी भर सभेत ग्वाही दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी महिलांसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. यावेळी चाळीसगाव शहर महिला मेळाव्यात महिला काँग्रेस शहर अध्यक्षा अर्चनाताई पोळ यांनी देखील मार्गदर्शन करत केले. यावेळी आदरणीय जिल्हाध्यक्ष दादासाहेब प्रदीप पवार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब उल्हास पाटील माजी खासदार, जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष सुलोचनाताई वाघ, प्रदेश  उपाध्यक्ष योगेंद्र भैय्या पाटील, महाराष्ट्र प्रदेश सचिव आदरणीय महामंडलेश्वर पार्वती जोगी, माजी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, माजी जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, अविनाश भालेराव, माजी आमदार ईश्वरभाई जाधव, शिवलाल साबणे, माजी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष इंटक काँग्रेस, नीळकंठ साबणे, रवींद्र भाऊ पोळ, बाळासाहेब पाटील, काँग्रेस सेवा दल आर. डी. चौधरी, अशोक खलाने, प्रदीप देशमुख, रमेश शिंपी, तालुका अध्यक्ष अनिल निकम, देवेन्द्र पाटील, अमोल राऊळ, मंगेश अग्रवाल, गफ्फार शेख, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष गयास बाबा, मोहन बोरसे, संतोष पोळ, युवक तालुका अध्यक्ष मधू गवळी, युवक शहर अध्यक्ष प्रज्वल राजपूत, निलेश भडक, नितीन पवार, देविदास खरटमल, सुनील भाऊ मोची, मंगेश बागुल, छोटू गवळी, रमेश नागणे, गजेंद्र कासार, हर्षल नन्नवरे व असंख्य कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.