भारतातून तालिबानचे समर्थन; १४ जणांना अटक

0

गुवाहाटी, लोकशाही न्यूज नेटवर्क  

सोशल मिडीयावर तालिबानचे समर्थन करणारा मजकूर टाकल्याबद्दल आसाम पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे. तर शुक्रवारी रात्रीपासून आसामच्या विविधभागातून या लोकांवर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात आयटी कायदा, सीआरपीसी आदि कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सोशल मीडियावर अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जाचे समर्थन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आसाममध्ये १४ जणांना अटक केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी रात्रीपासून या अटक करण्यात आल्या आणि त्यांच्यावर बेकायदेशीर क्रिया (प्रतिबंध) कायदा, आयटी कायदा आणि सीआरपीसीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://twitter.com/gpsinghips/status/1428983640654970883?s=19

पोलीस महासंचालक जीपी सिंह यांनी ट्वीट करत सोशल मिडीयावर पोस्ट करतांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच अफगाणिस्तान तालिबान वादावर पोस्ट लाईक करतांना देखील सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. जीपी सिंह म्हणाले, आसाम पोलिसांनी तालिबानी कारवायांशी संबंधित सोशल मीडिया पोस्टसाठी १४ लोकांना अटक केली आहे ज्यांनी बेकायदेशीर पोस्ट केल्या आहेत. आसाम पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आक्षेपार्ह पोस्टसाठी सोशल मीडियावर सतर्क आणि देखरेख करत आहोत. मेट्रोपोलिटन, बारपेटा, धुबरी आणि करीमगंज जिल्ह्यातून प्रत्येकी दोन जणांना अटक करण्यात आली. दरांग, कचर, हैलाकंडी, दक्षिण सलमारा, गोलपारा आणि होजाई जिल्ह्यातून प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली.

तसेच सोशल मिडीयात काही प्रक्षोभक मजकूर प्रक्षेपित केला जात नाही ना यावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत असे आसाम पोलिसांनी सांगितले.तालिबानच्या बाजूने त्यांचे समर्थन करणाऱ्या पोस्ट कोणी सोशल मिडीयावर टाकल्या तर त्याची माहिती पोलिसांना कळवण्याचे आवाहनही पोलिसांनी राज्यातील जनतेला केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.