वेळी अभावी झाला पाऊस, बळीराजा आला रडारवर.. शेतातील पिकाची शासनाला अहर्त हाक…

0

रजनीकांत पाटील, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मी शेतातल पीक दिवसरात्र एक करून राबराब राबून रक्ताचं पाणी करुन माझा बळीराजा माझा जन्म व्हावा, त्यासाठी अतोनात मेहनत घेऊन झिजणारा   खूप मेहनत करून त्या शेतीची मशागत करून  तो त्या मातीला भुसभुशीत करतो.  तसेच वरुण देवतेला विनवणी करत आपल्या हाकेने बोलावत असतो.   जेणेकरून त्या वरुण देवतेचा पाण्याचा थेंब शेतातील माझ्या कळ्या आईच्या कुशीत पडेल आणि त्या काळ्या आईच्या उदरातून माझा एक रोप म्हणून पीक म्हणून जन्म होईल.

या आशेने एकटक त्याचे डोळे आभाळाकडे वळवत,  मांडी मोडून तो शेताच्या बांधावर बसून राहतो. मागील वर्षभरापासूनची  परिस्थिती पाहिली तर, नोकरदारचा खिसा खाली झाला आहे.  माझ्या बळीराजाचा विचार केला तर  आजच्या घडीला त्याच्याकडे एक फुटकी कवडीसुद्दा नाहीय. अशा परिस्थितीत   माझा जन्म घेऊन देखील काही उपयोग नाही. कारण मी त्याच्या जन्माचे पांग फेडू शकणार नाही. कारण मला बळकट बनवण्यासाठी पुरेसं पाणी मिळालं नाही. माझ्या शरीराची वाढ होईल, अशा वेळेस त्या बळीराजाकडे पावसाने पाठ फिरवली.  त्या वरूनदेवाने माझा जरासुद्दा विचार केला नाही.  अशा स्थितीमध्ये मी त्या बळीराजाचे पांग फेडू शकत नाही, या गोष्टीची मला खंत आहे. अगोदरच माझा नायनाट झाला असता तर बरे झाले असते. असा विचारही माझ्या मनात मी कुढत  असते.  जेणेकरून माझा जन्म होऊन माझ्या शरीराची वाढ व्हावी.  यासाठी माझी अतोनात केली राखण आणि मेहनत, तसेच  सावकाराकडून घेतलेले कर्ज आजच्या घडीला डोक्यावर एवढा  कर्जाचा भार पेलत आहे.

एवढा कर्जाचा बोझा पेलून कर्जाची फेड कशी करू?  आज त्याने तो एवढा पैसा माझ्यावर खर्च केलाय तो कसा फेडणार? या चिंतेत तो आहे. शेतात  तो माझ्याजवळ आल्यावर  मला जवळ घेऊन, माझा चेहरा एकटक बघत असतो. तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी भरून येते. त्याच्या डोळ्यातील तो अश्रूंचा झरा पाहून माझं अर्ध आयुष्य संपल्यासारखे झाला आहे. तरी पण मी त्या माझ्या राज्याला धीर देत,  खंबीर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे. पावसाचा  थेंब जमिनीत पडावा यासाठी खूप काही त्याने देवाला विनवणी केली. अमावस्या झाली तरीदेखील रोजचे भरून येणारे आभाळ बरसले नाही.  शेवटी त्याने स्वतःच्या डोक्यावर निंबाचे पाने  बांधून धोंड्या होत गावभर हिंडला. “धोंड्या-धोंड्या पाणी दे” म्हणत  गावाच्या शिवारावर पोहोचला. तरीदेखील देवाने त्याची आर्त हाक ऐकली नाही.

वेळ गेला आणि पाऊस आला

माझ्या शरीराची वाढ खुंटली.  माझी तहान विझल्यावर वरुणदेवाने मला पाणी पाजले. त्या पाण्यावर मला फक्त जीवनदान मिळाले, मात्र जीवनदान नाही.  म्हणून माझी वाढ खुंटली.  मी फक्त जिवंत राहणार, मात्र माझ्या बळीराजाने माझ्याकडून केलेल्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. या गोष्टीची मला मोठी खंत आहे.  त्याच्याकडे बघून मी फक्त एकाच जागी थक्क आहे. आज त्या बळीराजाने वर्षभर मला लहान बाळासारखं पोटाच्या मुलासारखं वागत असतो. मी मात्र त्याचे पांग फेडू शकत नाही. त्याने माझ्यावर जो खर्च केला आहे. तो मी त्याला माझ्या माध्यमातून देऊ शकत नाही, अशी परिस्थिती यावर्षी झाली आहे. तरी देखील तो मोठ्या आशेने पुढील जीवन जगत आहे.

शासनाला माझी एक विनवणी आहे की, जो माझा कष्टकरी बाप आहे, ज्याने मला जन्म दिला. त्याच्या झोळीत त्याच्या पोटापुरते, त्याचा उदरनिर्वाह होईल, अशी एक मदत म्हणून मी पीक म्हणून तुम्हाला विनवणी करत आहे. माझा तर अंत झालाचा आहे, त्याचा आता अंत पाहू नका.  की जेणेकरून त्याचा कर्जाचा भार तर कमी होणार नाही.  पण थोडं तरी त्याचा ताटात द्या..  हीच हात जोडून कळकळीची विनंती शासनाला आहे…

Leave A Reply

Your email address will not be published.