दिलासादायक: नाशिक विभागातुन आजपर्यंत 9 लाख 06 हजार 894 रुग्ण कोरोनामुक्त

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे.  विभागातून आजपर्यंत 9 लाख 33 हजार 278 रुग्णांपैकी 9 लाख 06 हजार 894  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 7 हजार 374 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आजपर्यंत विभागात 18 हजार 954 रुग्णांचा मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.17 टक्के आहे, तर मृत्युदर 2.03 टक्के इतका आहे. अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.

नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 56 लाख 18  हजार 127 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 9 लाख 33  हजार 278 अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गंडाळ यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 02 हजार 824  कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 3 लाख 93 हजार 229  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 1 हजार 72  रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के इतके आहे. आजपर्यंत 8 हजार 523 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 2.11  टक्के आहे .

अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.86 टक्के

अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 3 लाख 1 हजार 714  कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 2 लाख 89 हजार 252 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 6 हजार 224 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.86 टक्के इतका आहे. आजपर्यंत 6 हजार 238 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 2.06 टक्के आहे.

धुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.41 टक्के

धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 45 हजार 790 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 45 हजार 66 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 04 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.41 टक्के इतके आहे. आजपर्यंत 668 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.45 टक्के आहे.

जळगांव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.14 टक्के

जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 611 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 1 लाख 39 हजार 970 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच  64 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.14 टक्के इतका आहे. आजपर्यंत 2 हजार 575  रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.80 टक्के आहे.

नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के

नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत 40 हजार 339 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 39 हजार 377 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 10 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के इतके आहे. आजपर्यंत 950  रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 2.35 टक्के आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.