चाळीसगाव येथे बस उलटली ,3 प्रवासी गंभीर

0

चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव : अहमदाबादकडूनछ त्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस  पुलावरुन उलटून बसमधील 3 प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना मेहूणबारे गावाजवळ मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. जखमींना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असून या अपघातात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

चाळीसगावातून अहमदाबाद कडून छत्रपती संभाजीनगरकडे (जीजे ०१ ईटभ ९९०६) क्रमांकाची एच. के ट्रॅव्हल्सची बस जाण्यासाठी निघाली. मेहूणबारे गावाजवळून जात

असतांना धुक्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस ही थेट गिरणा नदीच्या पुलावरुन उलटून बसचा अपघात झाला. या अपघातात बसमधील 3 प्रवाशी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक सहा निरीक्षक रूपाली पाटील, पोलिस

अपघातात बारा प्रवासी गंभीर जखमी; सुदैवाने जिवीतहानी टळली

उपनिरीक्षक अशोक चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु करीत जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविले.

सुदैवाने जिवितहानी टळली चाळीसगाजवळील औट्रम घाटात चालकाचे नियंत्रन सुटल्यामुळे कार दरीत कोसळून

चार जण ठार झाल्याची घटना ताजी आहे. आज पुन्हा धुक्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामूळे बस उलटून अपघात झाला. मात्र यामध्ये सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. क्रेनच्या सहाय्याने काढली बस

अपघात झाल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघाग्रस्त बस बाहेर काढण्यात आली. याप्रकरणी चालकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सध्या धुक्याचे प्रमाण वाढले असून वाहनधारकांनी सावधपणे वाहने चालविण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.