पुण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग कर्नाटकहून पुण्याकडे येणाऱ्या मालवाहू ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत (दि.२८) मंगळवारी रात्री नऊ च्या सुमारास घडली आहे. सतपाल झेटिंग कावळे (वय -४५, रामलिंग मुडगड, ता. निलंगा. जी. लातूर) असे मृत ट्रकचालकाने नाव आहे.

कावळे हे कर्नाटकहून ट्रकमध्ये माल भरून पुण्याच्या दिशेने येत होते. पुणे-सोलापूर महामार्गावरून जात असतांना त्यांची ट्रक लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी माळा परिसरात आली असता, त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यानंतर त्यांनी ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतली.

ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतल्यानंतर ट्रक चालक कावळे खाली उतरले. कावळे त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन केला व माझ्या छातीत तीव्र वेदना होत असल्याचे फोनद्वारे कळविले. नातेवाईकांनी थोडावेळ आराम करण्यास सांगितले. त्यानुसार कावळे यांनी जेवण केल्यानंतर आराम केला. पण नंतर ते उठलेच नाही. ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतल्यानंतर ट्रक चालक कावळे खाली उतरले. कावळे यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन केला व माझ्या छातीत तीव्र वेदना होत असल्याचे फोनद्वारे सांगितले. नातेवाईकांनी जेवण करा व थोड्यावेळ आराम करा असे सांगितले. त्यानुसार कावळे यांनी जेवण केल्यानंतर ते झोपले. त्यानंतर ते उठलेच नाहीत, त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी लोणी काळभोर पोलीस व प्राथमिक आरोग्य केंद्रात दिली. पोलिस तातडीने ॲम्बुलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झाले. बनसोडे यांनी कावळे यांची तपासणी केली असता कावळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.