उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची सुखरूप सुटका

0

उत्तरकाशी :  उत्तराखंडमधील बोगद्यात गेल्या १७ दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांची बचाव मोहीम अखेर 28 रोजी मंगळवारी पूर्ण झाली.

17 दिवस चाललेल्या देशातील सर्वात मोठ्या बचाव मोहिमेद्वारे मंगळवारी रात्री कामगारांना बाहेर काढण्यात आले सर्व कामगार निरोगी आहेत.

मृत्यूच्या जबड्यातून रात्री ८ वाजेच्या सुमारास पहिला मजूर बाहेर आल्याचे जाहीर करण्यात आले आणि संपूर्ण देशवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या वेळी बचाव मोहिमेतील कर्मचाऱ्यांनी ‘भारतमाता की जय’ असा जयघोष केला.

मंगळवारी घडामोडींना वेग आला होता. बोगद्याबाहेर असलेल्या रुग्णवाहिकांना दुपारी बोगद्यात नेण्यात आले. याशिवाय केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे मंगळवारीच आनंदवार्ता मिळणार, हे जवळपास निश्चित झाले होते. रॅट मायनर्स अर्थात चिंचोळ्या जागेत ड्रिलिंग करण्यात निष्णात असणारे सहा कर्मचारी बोगद्याच्या ढिगाऱ्यातील अखेरचे काही फुटांचे खोदकाम करण्यात आपल्या प्रयत्नांची शिकस्त करत होते आणि त्यांच्या प्रयत्नांना यश यावे, यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत होता. या खाण कामगारांनी सुमारे२१ तासांत १२ मीटरचे ड्रिलिंग हाताने करत आपली जबाबदारी पार पाडली. संध्याकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी मजुरांपर्यंत ८०० मिमी व्यासाचा पाइप टाकण्यात आला.

यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास या पाइपमधून स्ट्रेचरद्वारे विजय होरी नामक पहिला मजूर बाहेर पडला. धामी आणि सिंग यांनी पुष्पहार घालून या मजुराचे स्वागत केले. यानंतर एकेक करून सर्व मजुरांना या पाइपद्वारे
काढण्यात आले. मजुरांना तत्काळबा हेर नेण्यापूर्वी बोगद्यात तयार करण्यात आलेल्या ४१ खाटांच्या एका तात्पुरत्या रुग्णालयात त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली.

यानंतर रुग्णवाहिकांद्वारे त्यांना ३५ किमी अंतरावरील चिन्यालीसौड येथील एका विशेष रुग्णालयात नेण्यात आले. एखाद्या मजुराची तब्येत अधिकच बिघडली तर ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात हलवण्यासाठी चिन्यालीसौड विमानतळावर एक चिनूक हेलिकॉप्टरदेखील तैनात ठेवण्यात आले आहे.

ब्रह्मखाल-यमुनोत्री महामार्गावरील सिलक्यारा बोगद्याचा एक भाग १२ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास ढासळला. दगडमातीचा तसेच बोगद्याच्या छतामधील सिमेंट, लोखंडी सळ्यांचा समावेश असलेल्या सुमारे ६० मीटर जाडीच्या पान ७ वरग त १७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेले ४१ मजूर सुखरूप बाहेर पडल्याचे जाहीर होताच देशभरात जल्लोष करण्यात आला. बचाव मोहिमेतील कर्मचाऱ्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले आणि भारतमातेचा जयघोष केला. घटनास्थळी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

अडकलेले मजूर आणि बाहेरडो ळ्यांत प्राण आणून त्यांची वाट पाहणारे नातेवाईक यांच्या भेटीचा क्षण पाहणाऱ्या प्रत्येकाच्याच डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. एनडीआरएफ, एसडीआरएफ, बीआरओ, लष्कराचे जवान आणि देश-विदेशातील खाणकाम क्षेत्रातील तज्ज्ञ या बचाव मोहिमेत सहभागी झाले होते. याशिवाय, मजुरांचे मानसिक आरोग्य बिघडू नये म्हणून मानसोपचार तज्ज्ञांचीदेखील मदत घेण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.