‘कंगना ही राक्षसी वृत्तीची बाई…’; किशोरी पेडणेकर संतापल्या

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चांगलीच चर्चेत आहे. त्यातच शिवसेना आणि कंगना यांचं आधीपासून वाकडं आहे. अशातच आज मुंबईच्या  महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“भयानक कंगना ही राक्षसी वृत्तीची बाई आहे”, अशा कठोर शब्दात किशोरी पेडणेकर यांनी कंगनाला टोला लगावला आहे. इतकेच नाही तर महापौर म्हणाल्या  “सकाळी सकाळी बाईचं नाव घेऊ नये”, . आज शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा 9वा  स्मृतीदिन आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी कंगना रणौतनं केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. कंगना ही भयानक राक्षसी वृत्तीची बाई असल्याचं किशोरी पेडणेकरांनी म्हटलं आहे. तर कंगना एकावर एक नीच कळस दिवसेंदिवस करत असल्याचा हल्लाबोल ही महापौरांनी केला आहे.त्यामुळे सकाळी सकाळी बाईचं नाव घेऊ नये, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. कंगना रणौतचं वादग्रस्त वक्तव्य कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले’ असे वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि यावरुन वादंग निर्माण झाला. तसेच तिला मिळालेले पुरस्कार परत घ्यावेत अशी देखील मागणी होताना दिसत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.