चाईल्ड पॉर्नोग्राफीː देशातील 14 राज्यांसह जळगाव, धुळ्यात CBIचे छापे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

ऑनलाइन बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफी  प्रसार करणार्‍यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने धाडसत्र टाकले असून यात जळगावातही छापे मारण्यात आले आहेत. तसेच या धुळ्याचा देखील समावेश आहे. याप्रकरणी अधिक माहिती  सीबीआयने अधिकृत प्रेस नोटमध्ये दिली आहे.

https://cbi.gov.in/Media/Press-Releases

देशातील 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 70 ठिकाणी छापे टाकून 83 आरोपींविरुद्ध 23 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील आरोपींचे धागेदोरे हे शंभर देशांची जुळले असल्याची शक्यता आहे. चौकशीत आतापर्यंत 50 हून अधिक ग्रुप आढळून आले आहेत.

चाईल्ड पॉर्नोग्राफी सामग्रीशी संबंधित गुन्ह्यांवर देशव्यापी समन्वित कारवाईमध्ये, केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने १४ नोव्हेंबर २०२१ रोजी ८३ आरोपींविरुद्ध ऑनलाइन बाल लैंगिक शोषण आणि शोषणाशी संबंधित आरोपांवर २३ स्वतंत्र प्रकरणे नोंदवली. यानंतर काल म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी  देशभरात छापे टाकण्यात आले. यात जळगावातही छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे.

सीबीआयने केलेल्या छापेमारीच्या कारवायांमुळे जळगाव धुळे जिल्हा पुन्हा रडारवर आला आहे. यावेळी माऊ, चांदवली, वाराणसी ,गाजीपुर, सिद्धार्थनगर, मुरादाबाद, गाजियाबाद, मुजफ्फरनगर, जुनागड, भावनगर, जामनगर, संगरुर, मलेरकोटला, पतियाळा, पटणा, पानिपत, ओडीसा, राजस्थान, पालघर याठिकाणी छापेमारी करण्यात आली.

याप्रकरणी सीबीआयने केलेल्या तपासात आजवर सोशल मीडियातून आणि तसेच व्हाटसऍप ग्रुप्सच्या माध्यमातून बाल लैंगीक शोषण साम्रग्रीला मोठ्या प्रमाणात शेअर करत असल्याचे दिसून आले आहे. यासाठी त्यांना पैसे मिळत असल्याची माहिती देखील प्राथमिक तपासात समोर आली आहे.

२०२० च्या NCRB डेटानुसार, मुलांविरुद्ध सायबर पोर्नोग्राफीची सर्वाधिक प्रकरणे उत्तर प्रदेशात १६१, महाराष्ट्रात १२३, कर्नाटक १२२ आणि केरळमध्ये १०१ नोंदली गेली आहेत. याशिवाय ओडिशामध्ये ७१, तामिळनाडूमध्ये २८, आसाममध्ये २१, मध्य प्रदेशात २०, हिमाचल प्रदेशमध्ये १७, हरियाणामध्ये १६, आंध्र प्रदेशमध्ये १५, पंजाबमध्ये ८, राजस्थानमध्ये ६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी केरळ आणि कर्नाटक वगळता इतर राज्यांमध्ये आज छापे टाकण्यात येत आहेत. याशिवाय आज गुजरात आणि दिल्लीतही सीबीआयचा तपास सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.