उद्यापासून मू.जे महाविद्यालयात “युवारंग २०२३” ची धामधूम…

विद्यार्थ्यांपेक्षा दुप्पट विद्यार्थिनींचा सहभाग...

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आयोजित “युवारंग 2023” खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय कान्ह कला नगरीत दिनांक 7 ऑक्टोबर 2023 ते 11 ऑक्टोबर दरम्यान आयोजित होत आहे.

त्यानुषंगाने खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाचे प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, प्राचार्य संजय भारंबे (मूळजी जेठा महाविद्यालय), राजेंद्र नन्नवरे (राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य), अँड. प्रवीणचंद्र जंगले (सहसचिव केसीई सोसायटी) शशिकांत वडोदकर (सांस्कृतिक समन्वयक) युवारंग समन्वयक डॉ जुगलकिशोर दुबे, सहसमन्वयक डॉ. मनोज महाजन, डॉ. पवित्रा पाटील यांच्या हस्ते पत्रकार परिषदेत युवारंगच्या “कान्ह कलानगरी’ लोगोचे विमोचन यावेळी करण्यात आले.

यामध्ये जळगाव धुळे व नंदुरबार या तिघं जिल्ह्यामधून सुमारे 1555 विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होणार असून, यामध्ये मुलींचा सहभाग यावेळी लक्षणीय असा आहे. यावेळी तब्बल 714 विद्यार्थिनी तर 474 विद्यार्थी सहभाग नोंदवत असल्याचे आयोजकांनी कळविले. पहिल्या दिवशी दि.७ रोजी सांस्कृतिक पथसंचलन दुपारी चार वाजता मूळजी जेठा महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरू होईल. ते पथसंचलन स्वतंत्र चौक मार्गे, नवीन बस स्थानक तर त्याचे समापन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादनाने होईल. यामध्ये विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक पथसंचलन असेल ज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, शिवराज्याभिषेक सोहळा अशा विविध विषयांचा विद्यार्थी पेहराव करून या पथसंचलनात सहभागी होणार आहेत तर उद्घाटन सोहळा दुसऱ्या दिवशी दि.८ रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री मा.ना.श्री. चंद्रकांतदादा पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक विजय महेश्वरी तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री मा.ना. गुलाबराव पाटील, ग्राम विकास मंत्री मा.ना. गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आयोजन समितीचे अध्यक्ष तथा केसीई संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, कार्याध्यक्ष राजेंद्र ननवरे आदी मान्यवरांची उपस्थिती राहील. या पाच दिवस चालणाऱ्या युवारंग युवक महोत्सवात मूळजी जेठा महाविद्यालयाच्या प्रांगणात पाच रंगमंच तयार करण्यात आले आहेत.

1.कवयित्री बहिणाबाई चौधरी रंगमंच क्रमांक- (एकलव्य क्रीडांगण) मुख्य रंगमंच उद्घाटन व समारोप, 2. पद्मश्री ना. धो. महानोर रंगमंच क्रमांक-2 (ओल्ड कॉन्फरन्स हॉल), 3. पूज्य साने गुरुजी रंगमंच क्रमांक -3 (हॉल क्रमांक 29 मुख्य इमारत, पहिला मजला), 4. भारतरत्न लता मंगेशकर रंगमंच क्रमांक-4 (ग्रंथालय जवळील वाचनालय), 5. कलामहर्षी केकी मूरा रंगमंच क्रमांक-5 (ह्युमॅनिटीज बिल्डिंग)

या युवारंग युवक महोत्सवात संगीत- भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत, नाट्यसंगीत, भारतीय सुगम संगीत, भारतीय समूह गाण, भारतीय लोकसंगीत वाद्य- पाश्चिमात्य गायन पाश्चिमात्य वाद्य, संगीत पाश्चिमात्य समूह गान, नृत्य- भारतीय शास्त्रीय नृत्य, भारतीय लोक समूह नृत्य, वाङ्मयीन कला प्रकारात वकृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा रंगमंच या कला प्रकारात नक्कल, मुकाभिनय, प्रहसन आणि ललित कला प्रकारात स्थळचित्र, चिकटकला, पोस्टर मेकिंग, माती कला, व्यंगचित्र, रांगोळी, स्थळ छायाचित्र, इन्स्टॉलेशन, मेहंदी या विषयांवर विद्यार्थी सादरीकरण करणार आहेत. याकरिता परीक्षक बाह्य विद्यापीठाच्या कक्षेतील आहेत. यासह विद्यार्थ्यांची निवासी राहण्याची व्यवस्था स्वामी विवेकानंद भवन येथे ६०० विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ७०० यांची निवासी व्यवस्था मुलींच्या वसतिगृहात केली आहे.

कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण दि.११ रोजी होणार असून या करिता कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. टी. इंगळे (प्रकुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ), पारितोषिक वितरण सुप्रसिद्ध सिने कलाकार जय मल्हार फेम सुरभी हांडे या उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार शिरीष चौधरी (यावल रावेर मतदार संघ), आमदार सुरेश भोळे (राजुमामा, जळगाव शहर मतदार संघ), प्रमुख उपस्थिती डॉ. विनोद पाटील (कुलसचिव), एडवोकेट प्रवीणचंद्र जंगले (सहसचिव केसीई सोसायटी), ज्ञानदेव पाटील (खजिनदार, केसीई सोसायटी), कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे (राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य) हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष भालचंद्र पाटील (सदस्य केसीई सोसायटी) उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला विद्यार्थी विकास विभागाचे प्रा. जयेंद्र लेकुरवाले, प्राचार्य संजय भारंबे (मूळजी जेठा महाविद्यालय), राजेंद्र नन्नवरे (राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य), अँड. प्रवीणचंद्र जंगले (सहसचिव केसीई सोसायटी), शशिकांत वढोदकर (सांस्कृतिक समन्वयक) युवारंग समन्वयक डॉ. जुगलकिशोर दुबे, सहसमन्वयक डॉ. मनोज महाजन उपस्थित होते.

यंदाचा युवारंग महोत्सव हा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात न घेता ऑक्टोबर महिन्यात आयोजित होत आहे. यावेळी विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या नाश्त्यापासून तर दुपारच्या व रात्रीच्या रुचकर जेवणाची व्यवस्था महाविद्यालयाकडून केली गेली आहे. विद्यर्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने २४ तास वैद्यकीय व्यवस्था, रुग्णवाहिका व आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशामक बंब देखील २४ तास सेवेत असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.