पोर्नोग्राफी संदर्भात राज कुंद्रा ने पहिल्यांदाच केला ‘हा’ खुलासा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिल्पा शेट्टी हिने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवून प्रेक्षकांना वेड लावले होते. शिल्पा शेट्टी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शिल्पा शेट्टी फिटनेस प्रेमी असून तिच्या चाहत्यांसाठी नवीन काही ना काही घेऊन येत असते. शिल्पा शेट्टी हिचा नवरा राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात फसल्याने चांगलंच चर्चेत आला होता.

शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा गेल्या तीन ते चार वर्षांपासून सतत चर्चेत आहे. राज कुंद्रावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. थेट पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा याचे नाव पुढे आले होते. त्याच आरोपांच्या संदर्भात राज कुंद्राला जेलमध्ये राहण्याची सुद्धा वेळ आली होती.

पहिल्यांदाच राज कुंद्रा हा थेट पोर्नोग्राफी संदर्भात बोलतांना दिसत आहे. राज कुंद्रा हा स्टॅंड अप कॉमेडी करतांना बघायला मिळत आहे. त्यात तो स्वतःची ओळख मास्कमॅन आणि शिल्पा शेट्टी हिचा पती म्हणून करतो.

राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणावर बोलताना थेट म्हणाला की, माझे काम लोकांना कपडे घालणे आहे, काढणे नाही. इतकेच नाही तर राज कुंद्रा थेट म्हणाला की, या दोन वर्षांमध्ये मला पापाराझी यांनी प्रचंड प्रेम दिले. पापाराझी यांचे फक्त हेच लक्ष की, मी काय कपडे घालतो आणि उर्फी जावेद हिने काय कपडे नाही घातले.

Leave A Reply

Your email address will not be published.