आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकासह भारतीय पुरुष हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

आशियाई क्रीडा 2023 मधील पुरुष हॉकीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने जपानचा 5-1 अशा मोठ्या फरकाने सहज पराभव केला आणि सुवर्णपदकावर कब्जा केला. 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. 2018 मध्ये टीम इंडियाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. अंतिम फेरीत भारताकडून मनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग, अभिषेक आणि अमित रोहिदास यांनी गोल केले. या विजयासह भारत पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरला आहे.

भारताने आपल्या पूल ए सामन्यात जपानचा 4-2 असा पराभव केला होता. अंतिम फेरीत मोठ्या विजयासह भारताने या स्पर्धेत जपानला पराभूत करण्याची ही दुसरी वेळ आहे. भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने चमकदार कामगिरी करत दोन गोल केले. जपानने पहिल्या हाफ मध्ये उत्कृष्ट बचावाचे प्रदर्शन केले पण भारताने दुसऱ्या हाफमध्ये चार गोल करत पूर्ण वर्चस्व राखले.

पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी उत्कंठावर्धक कामगिरी केली, मात्र त्यांना गोल करण्यात अपयश आले. हरमनप्रीतने 14व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताला आघाडी मिळवून देण्याची संधी गमावली आणि त्याचा प्रयत्न ताकुमीने शानदारपणे रोखला. रोहिदासचीही १७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी हुकली.

मनप्रीतने चमकदार कामगिरी केली

मनप्रीतने 25व्या मिनिटाला गोलकीपरला रिव्हर्स फ्लिकच्या सहाय्याने स्पर्धेतील 13वा गोल करून भारताला यश मिळवून दिले. हाफ टाईमच्या शिटीपर्यंत भारताने आपली आघाडी कायम ठेवली आणि जपानला पुनरागमन करण्यात अपयश आले. भारताने ब्रेकनंतर चांगली कामगिरी केली आणि चार गोल नोंदवून एशियाड 2023 मध्ये आपले वर्चस्व कायम राखले.

Leave A Reply

Your email address will not be published.