नेदरलँडच्या खेळाडूने केली विश्वचषकाच्या अनोख्या इतिहासाची पुनरावृत्ती…

0

 

हैद्राबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

शुक्रवारी येथे पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शाहीन शाह आफ्रिदी आणि हसन अली पाकिस्तानच्या इलेव्हनमध्ये परतले आहेत. बास डी लीडे देखील नेदरलँड्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळत आहे. खरं तर, त्याने कमालीच्या अनोख्या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. बास डी लीडेचे वडील नेदरलँड्सकडून विश्वचषकही खेळले आहेत. म्हणजेच बास डी लीडेचे वडील टिम डी लीडे हे एकदिवसीय विश्वचषक खेळणारी सातवी पिता-पुत्र जोडी ठरली आहे.

बास डी लीडेचे वडील टिम डी लीडे हे पहिल्या तीन विश्वचषकांमध्ये (1996, 2003 आणि 2007) नेदरलँडचा भाग होते. आता टीम डी लीडेचा मुलगा बास डी लीडेही वर्ल्ड कप खेळत आहे. याचाच अर्थ विश्वचषकात सहभागी होणारी ही दोघेही सातवी पिता-पुत्र जोडी ठरली आहे. त्यांच्या आधी ६ पिता-पुत्र विश्वचषक खेळले आहेत.

विश्वचषकातील पिता-पुत्र जोडी:

डॉन प्रिंगल (पूर्व आफ्रिका), डेरेक प्रिंगल (इंग्लंड)

लान्स केर्न्स, ख्रिस केर्न्स (न्यूझीलंड)

ख्रिस ब्रॉड, स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)

ज्योफ मार्श, मिचेल मार्श, शॉन मार्श (ऑस्ट्रेलिया)

रॉड लॅथम, टॉम लॅथम (न्यूझीलंड)

केविन करन (झिम्बाब्वे), सॅम कुरन (इंग्लंड)

टिम डी लीडे, बास डी लीडे (नेदरलँड)

Leave A Reply

Your email address will not be published.