योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षित वाढ, वाचा सविस्तर

0

लखनौ, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. सीएम योगी यांच्या लखनौ बाहेरील दौऱ्यादरम्यान त्यांना अतिरिक्त सुरक्षा पथक दिले जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भाजपचे (BJP) स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे कर्नाटकातील (Karnataka) आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते जाणार आहेत. यादरम्यान त्यांना कडेकोट सुरक्षा देण्यात येणार आहे.

सीएम योगींना अतिरिक्त सुरक्षा
अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf) यांच्या हत्येनंतर सीएम योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये अधिकाऱ्यांची मोठी बैठक घेतली. यामध्ये राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यासोबतच मुख्यमंत्री योगी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम तूर्तास रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जेव्हा यूपीच्या बाहेर दौऱ्यावर जातील तेव्हा अतिरिक्त सुरक्षा पथक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.