‘किसीका भाई किसकी जान’ चित्रपटासाठी रामचरणने घेतले तब्बल इतके मानधन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

किसीका भाई किसकी जान (Kisika Bhai Kisaki Jan) या चित्रपटामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत आहेत, पण बऱ्याच कलाकारांनी सुद्धा या चित्रपटाच्या माध्यमानून पदार्पण केले आहे. किसी का भाई किसी की जान या सलमान खान (Salman Khan) याच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळत आहे. हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा सलमान खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. सलमान खान याच्या या चित्रपटामधून श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी आणि बिग बाॅस फेम शहनाज गिल (Shahnaz Gill) ही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

 

एवढच नाही तर खरा चर्चेचा विषय आहे तो रामचरण (Ram Charan), सलमान खान याच्या चित्रपटामध्ये साऊथ स्टार राम चरण याची झलकही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. एका गाण्यामध्ये राम चरण याने केमिओ केला आहे. मात्र, फक्त काही मिनिटांच्या केमिओसाठी राम चरण याने तगडी फिस घेतलीये. राम चरण याने केमिओसाठी तब्बल 3 कोटी फिस घेतली आहे. Yentamma गाण्यामध्ये राम चरण सलमान खान याच्यासोबत दिसणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.