‘आरे कॉलनी’तील अतिरिक्त झाडे तोडल्याने MMRCL ला १० लाखांचा दंड

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

‘अति केली कि त्याची माती’ झाल्याशिवाय राहत नाही. आणि यामुळे नुकसान भरपाई करावी लागते. मुंबईतील आरे कॉलनीत (Aray Colony) मेट्रो कारशेड बांधण्यासाठी 84 झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली होती, पण जास्त झाडे तोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (MMRCL) 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने प्रकल्पाचे काम लक्षात घेऊन 177 झाडे तोडण्याची परवानगी दिली.

न्यायालयाने वृक्षतोड प्राधिकरणाची परवानगी घेतल्यावर ८४ झाडे तोडता येतील, असे सांगितले होते. पण अतिरिक्त झाडे तोडण्यात आली आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, एमएमआरसीएलने दोन आठवड्यांच्या आत वनसंरक्षकांकडे 10 लाखांची रक्कम जमा करावी.

Leave A Reply

Your email address will not be published.