सोलापूर वसतिगृहात पाणी नसल्याने ‘घागर’ आंदोलन

0

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

जिल्हा परिषदेच्या नेहरू वसतिगृहात मागील आठ दिवसापासून पाणी नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. सोलापुरात (Solapur) विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्यावतीने घागर आंदोलन (Ghagar Aandolan) करण्यात आलं आहे. टॉवेल आणि बनियन परिधान करून विद्यार्थी जिल्हा परिषदेत घुसले. घागर, बादली घेऊन जिल्हा परिषद सीईओच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांवी ठिय्या आंदोलन केलं. मागील आठ दिवसापासून प्यायला आणि अंघोळीला पाणी मिळत नसल्याने वसतिगृहातील विद्यार्थी आक्रमक झालेत. जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे. मागच्या आठ दिवसांपासून वसतिगृहात पाणी येत नाही. आम्हाला प्यायलासुद्धा पाणी नाहीये. अंघोळ करण्यासाठीही पाणी उपलब्ध नाहीये. आमच्या वसतिगृहात लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळित व्हावा, अशी मागणी निलेश सांगेपाग या आंदोलक विद्यार्थ्याने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.