पाच हजाराची लाच घेतांना कोतवालास रंगेहात पकडले

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल तालुक्यातील मालोद येथील तलाठी कार्यालयातील कोतवालास किनगाव येथील एका दुकानावर पाच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील मालोद येथील तलाठी कार्यालयात कोतवाल पदावर कार्यरत असलेला कर्मचारी जहांगिर तडवी रा. किनगाव ता. यावल जि.जळगाव याने तक्रारदाराकडून ५ हजाराची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार याने लाचलुचपत विभागाला तक्रार दिली होती.

लाचलुचपत विभागाने मंगळवार २२ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील किनगाव मंडळाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या एका स्टेशनरी दुकानासमोर तक्रारदाराकडून ५ हजाराची लाच स्विकारतांना कोतवाल हमीद तडवी याला रंगेहात पकडले आहे.

सदर कारवाईमुळे किनगावसह तालुक्यात खळबळ उडाली आहे. मात्र लाच घेण्यामागील कारणाची अधिकृत माहिती मिळाली नव्हती. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.