चाळीसगाव ;- का शेतकऱ्याच्या खिशातून ४ हजार रुपयांची रोकड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात चोरून नेल्याची घटना शनिवार ४ मे रोजी दुपारी १२ वाजता घडली . याप्रकरणी एकाला अटक करण्यात आले असून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज सलीम शहा वय-२० रा.अंबिका नगर ता. धुळे असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
चाळीसगाव तालुक्यातील चांभार्डी गावातील रहिवाशी पुरुषोत्तम नारायण भवर (वय-३३) हा शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान शनिवारी ४ मे रोजी दुपारी १२ वाजता ते चाळीसगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आलेले होते. दरम्यान संशयित आरोपी अरबाज सलीम शहा वय-२० रा. अंबिका नगर ता. धुळे याने शेतकरी पुरुषोत्तम भवर यांच्या खिशातून ४ हजार रुपयांची रोकड काढून चोरी केली. ही बाब लक्षात आल्यानंतर पुरुषोत्तम भंवर यांनी चाळीसगाव शहर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी ६.३० वाजता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी अरबाज सलीम शहा या चोरट्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विश्वास पाटील हे करीत आहे.