विष्णू मंदिरातील पंचधातूची मुर्ती चोरी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुणे 

बारामती; सोमवारी (दि. २१) होळ येथील ढगाई देवी मंदिरातील दानपेटीची चोरी झाल्याची घटना घडली असताना मंगळवारी (दि. २२) वडगाव निंबाळकर येथील विष्णू पंचायतन मंदिरातील पंचधातूची मुर्तीच चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही ठिकाणांमध्ये जेमतेम चार किलोमीटरचे अंतर आहे.

मंगळवारी पहाटे पूजारी पुजेसाठी गेले असताना पंचधातूची मुर्ती चोरीला गेल्याचे लक्षात आले. गावठाण भागातील मुख्य बाजारपेठेत हे पुरातन मंदिर आहे. पण सध्या मंदिराची दुरवस्था आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था मंदिरात नसल्यामुळे येथे अनावश्यक लोकांचा वावर असतो.

मंदिराचे व्यवस्थापन खासगी असल्यामुळे नागरिकांचा येथे हस्तक्षेप नाही. परिणामी भाविकांची वर्दळ ही कमी असते. रात्रीच्या वेळी कोणीही नसल्यामुळे चोरट्यांनी डाव साधला. चोरीला गेलेली मूर्ती पुरातन असल्यामुळे भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सोमवारी सायंकाळी दिवाबत्ती केल्यानंतर पूजाऱ्याने मंदीर बंद केले होते. सकाळी पुजेसाठी राजेंद्र काकडे गेले असता गाभाऱ्याचे दार उघडे दिसले. आतील मुर्ती सुमारे १०० वर्षापुर्वीची पंचधातुची होती. पुरातन मंदीरात घडलेल्या या प्रकाराबाबत भावीकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.