थंडी पळाली ! काही जिल्ह्यांचे तापमान 30 अंशाच्या पुढे..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात ऋतूंचा जांगडगुत्ता सुरु होता. मात्र सध्या उत्तर भारतामध्ये थंडीची लाट कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उत्तर भारतातील नाागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील सुद्धा अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 30 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे.

उत्तर पूर्व राज्यांत पाऊस

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारीला सिक्कीम, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस पडू शकतो. त्याचवेळी, वायव्य भारतातील बहुतांश भागात तापमानात किंचित वाढ जाणवू शकते, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.

महाराष्ट्राच्या तापमानात वाढ झालेली आहे. अनेक जिल्ह्यात तापमान पारा 30 अंशाच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. सोलापूर, सांगली, परभणी, पुणे, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, अकोला, नागपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढल्याने उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.

तर, पुढील तीन दिवस जम्मू काश्मीरसह हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.