यावल येथील तरुणाची विहिरीत उडी घेत आत्महत्या

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल तालुक्यातील चितोडा गावातील अविवाहीत तरुणाची संतापाच्या भरात शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दुर्गेश संतोष किनगे (वय-२३) रा.चितोडा ता.यावल या तरूणाने २८ सप्टेंबर गुरूवार रोजी यावल शिवारातील देविदास तुकाराम पाटील यांच्या शेतातील विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. या घटनेची खबर यावल पोलीस स्टेशनला पोलीस पाटील पंकज वारके यांना दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. मयत तरूणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रूग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे व वैद्यकीय अधिकारी डॉ मयुर चौधरी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.