एक व्हिडिओ कॉल आणि रेल्वेचा भीषण अपघात, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मथुरा रेल्वे स्थानकावर मंगळवारी एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास फलाट क्र. २ वर उभी असणारी दिल्ली-मथुरा इएमयू प्रवासी ट्रेन अचानक प्लॅटफॉर्मच शेवटचं टोक म्हणजेच बफर डेड एन्ड तोडून थेट प्लॅटफॉर्मवर चढली. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पायलट केबिनमधल्या सीसीटीव्ही फुटेजमधून अपघात घडला तेव्हा नेमकं पायलट केबिनमध्ये काय घडलं. त्यांचं सत्य समोर आलं आहे. हे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत असून, त्यानंतर रेल्वे विभागाचं पाच कर्मचाऱ्यांना याप्रकरणात निलंबित केले आहे. मथुरा जंक्शन येथे ट्रेन क्रमांक ०४४४६ शकुबस्ती मथुरा लोकल मथुरा जंक्शनवर मंगळवारी रात्री १०.५० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक २ A वर आली. त्यानंतर पाच मिनिटांत ही लोकल अचानक सुरु होऊन बफर एण्डला धडकल्याचे पाहायला मिळाले. या घटनेत सुदैवाने कोणाला काहीही झाले नाही. परंतु रेल्वेने या प्रकरणाची संयुक्त चौकशी केली असता लोकल ड्रायव्हर केबिनचा व्हिडिओ समोर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.