RBI ची 3 बँकांवर मोठी कारवाई, काय होणार परिणाम ?

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांसाठी काही नियम ठरवलेले असतात. तरीही काही बँका नियमांचे उल्लंघन करत असतात. या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील तीन मोठ्या बँकांना दंड ठोठावला आहे. यावेळी आरबीआयने सारस्वत सहकारी बँक लिमिटेड, बसेन कॅथोलिक सहकारी बँक लिमिटेड आणि राजकोट नागरी सहकारी बँक लिमिटेड यांना दंड ठोठावला आहे.

बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या तरतुदी आणि आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने सारस्वत सहकारी बँक लिमिटेड, मुंबईला 23 लाख रुपयांचा दंड ठोठावला. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, सारस्वत सहकारी बँकेने बीआर कायद्यातील तरतुदी आणि त्याअंतर्गत जारी केलेल्या आरबीआयच्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे. तसेच  कलम 20 च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल वसई, महाराष्ट्रातील बेसिन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 25 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. बेसिन कॅथोलिक सहकारी बँक तिच्या मालकीच्या एका संचालक/फर्मला अनेक असुरक्षित कर्जे दिल्याबद्दल दोषी आढळली आहे. रिझर्व्ह बँकेने ‘ठेवीवरील व्याज दर’ यासंदर्भात आरबीआयने जारी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल राजकोट नागरी सहकारी बँक लिमिटेड, राजकोटला 13 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

काही दिवसांपूर्वीच आरबीआयने एसबीआय आणि इंडियन बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांवर दंड ठोठावला होता. आरबीआयने सांगितले की, एसबीआयला 1.3 कोटी रुपये, इंडियन बँकेला 1.62 कोटी रुपये आणि पंजाब अँड सिंध बँकेला 1 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला होता.

रिझर्व्ह बँक वेळोवेळी नियमांचे पालन न केल्यामुळे बँकांवर दंड आकारते. मात्र त्याचा बँक खातेदारांवर कोणताही परिणाम होत नाही. बँक खातेदारांच्या रोख रक्कम काढण्यावर किंवा जमा करण्यावर कोणतेही निर्बंध येत नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.