सोने – चांदीच्या भावाने गाठला विक्रम, पहा आजचे भाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव प्रचंड वाढत आहेत. महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने 1000 रुपयांनी तर चांदी किलोमागे 600 रुपयांनी वधारली. मार्च महिन्यातच सोन्याने अनेक शहरात जीएसटीसह 70 हजार तर चांदी 78,000 रुपयांवर पोहचली होती.

जळगाव शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सोन्याचे दर 68,800 हजार आहेत म्हणजेच आज सोन्याच्या दरात 540 रुपयांनी वाढ झालेली आहे. तर चांदीचे आजचे दर 76,800 रुपये आहेत म्हणजेच  1,130 रुपयांनी आज चांदीचे दर वधारले आहेत.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने दरवाढीची सलामी दिली. 24 कॅरेट सोने 68,663 रुपये, 23 कॅरेट 68,388 रुपये, 22 कॅरेट सोने 62,895 रुपये झाले.18 कॅरेट 51,497 रुपये, 14 कॅरेट सोने 40,168 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 75,111 रुपये झाला.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.