‘शुक्र’ मोहिमेसाठी इस्रो सज्ज

0

श्रीहरीकोटा मंगळ, चंद्र आणि – सूर्य मोहिमेनंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो शुक्र मोहिमेसाठीही सज्ज झाली आहे. इस्रोने शुक्रयान मोहिमेच्या तयारीलाही सुरुवात केली आहे. शुक्र ग्रहावरील वातावरण आणि त्याचा प्रभाव यांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख सोमनाथ यांनी शुक्रयान मोहिमेसंदर्भात माहिती दिली.

चंद्रयान-३ (Chandrayaan-3) आणि आदित्य एल -१ (Aditya L-1) या मोहिमेनंतर आता भारताचं लक्ष्य शुक्र ग्रहावर आहे. मंगळ, चंद्र आणि सूर्य मोहिमेच्या यशानंतर आता इस्त्रो एका नव्या मोहिमेसाठी सज्ज झाली आहे.

इस्त्रोकडून शुक्रयान (ISRO Shukrayaan) मोहिमेच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. शुक्र ग्रहावरील वातावरण आणि त्यांच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

शुक्र ग्रहाचं वातावरण आणि तेथील आम्लीय वायूबाबत समजून घेण्यासाठी एक मोहीम हाती घेतली जाणार आहे. शुक्र आणि मंगळ ग्रहावर जीवन का नाही, या ग्रहांबाबत मुळापासून समजून घेण्यासाठी तिथे मोहीम पाठवणं आवश्यक आहे. इस्त्रो प्रमुखांच्या या वक्तव्याच्या काही महिन्यांपूर्वी इस्त्रोच्या एका शास्त्रज्ञाने शुक्रयान मोहिमेला विलंब होऊ शकतो, असा दावा केली होता. इस्त्रोकडून शुक्रयान मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे, मात्र शासनाकडून शुक्रयान मोहिमेसाठी अद्याप अधिकृत परवानगी मिळालेली नाही, अशी माहिती राष्ट्रीय विज्ञान अकादमी (National Science Academ)मध्ये इस्त्रो प्रमुखांनी शुक्रयान मिशनबाबत दिली.

शुक्राचा अभ्यास करणं का आवश्यक…
शुक्र ग्रहाभोवती ढगांचा थर जमा झाला आहे. त्यामध्ये आम्ल भरलेलं असतं. त्यामुळे कोणतेही अंतराळयान किंवा वाहन आम्लीय ढगांचे वातावरण ओलांडून शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागावर पोहोचू शकत नाही. सूर्यमालेच्या उत्पत्तीबद्दल माहिती मिळवण्यासाठी शुक्राचा अभ्यास करणं आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.