किमान तापमानातील चढ-उतार कायम

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात २० ठिकाणी तापमानाचा पार वाढला आहे. आणि आता उन्हाच्या झळा बसू लागल्या आहे. त्यामुळे कमाल तापमान पुढच्या काही काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या बहुतांश जिल्ह्यात 37 अंशांच्या पुढे तापमानाची नोंद होत आहे. तर उत्तरेतील काही जिल्ह्यात दिवसा उन्हाच्या झळा तर रात्रीच्यावेळी थंडी जाणवत आहे. यामुळे कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरूच आहेत. उत्तर महाराष्ट्रात तापमानात सकाळी थंड तर दुपारी उन्हाच्या झळा बसत आहे.

राज्याच्या किमान तापमानात सातत्याने वाढ होत असतानाच गुरुवारी उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा पुन्हा घसरला. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी 7 अंश सेल्सिअस, तर धुळे येथे 8.4 अंश, तर जळगाव येथे 9.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित राज्यात किमान तापमान 12 अंशांच्या पुढेच होते. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.