वसंत मोरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट ; चर्चेला उधाण

0

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर ते काय भूमिका घेणार याबाबत अद्याप काही जाहीर केलेलं नाही.वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करतील आणि वंचितच्या तिकिटावर ते पुण्यात लोकसभेच्या मैदानात उतरतील अशी चर्चा आहे.

मात्र, ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांच्या संपर्कात आहेत. त्यातच शुक्रवारी वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत राजगृह इथं भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.