जळगांव ;- शहर महानगरपालिका क्षयरोग केंद्र राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत दि.२६ रोजी क्षयरोग दिनानिमित्त महानगरपालिका आयुक्त पल्लवी भागवत व प्रमुख वैद्यकीय अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. राम रावलानी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
यावेळी आयुक्त पल्लवी भागवत व प्रमुख वैद्यकीय अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. राम रावलानी महापालिका उपायुक्त अभिजीत बाविस्कर, रोटरी गोल्ड सिटी क्लब अध्यक्ष प्रकाश पटेल, सेक्रेटरी मनीषा पाटील, विनायक बाल्दी यांच्या हस्ते डॉक्टर रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पी पी एम समन्वय कमलेश्वर आमोदेकर यांनी केले. यात निक्षय मित्र रोटरी गोल्ड सिटी क्लब, स्पेक्ट्रम कंपनी व डॉ. राम रावलानी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यात सदरील निक्षय मित्रांनो टी.बी पेशंटला संपूर्ण मदतीचा हात दिलेला असुन त्याला संपूर्ण मासिक किराणा (फुड बास्केट) मोफत रुग्णाला देण्यात येतो.
रुग्णाला बरे होण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होतो. यासाठी समाजातील दानशूर दात्यांनी पुढे येण्याचे आवाहन मा. आयुक्त यांनी केले. टी.बी. मुक्त भारत करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणाव्दारे टी. बी. रुग्णांचा शोध घेऊन औषधऔपचार करणेबाबत मार्गदर्शन देखील केले. त्याप्रमाणे डॉ. राम रावलानी यांनी सध्याची जळगांव शहरातील रुग्णांची स्थिती व बीसीजी व्हॅक्सिनेशन याविषयी माहिती दिली.
टी.बी हा आजार बरा होण्यासाठी आता प्रायोगिक तत्वावर अति जोखिमीच्या व्यक्तीना शासकीय नियमानुसार लस देण्यात येणार आहे. जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून एमडीआर शहर रुग्णांना निक्षय मित्रांच्या वतीने फुड बास्केट वाटप करण्यात आले. तसेच सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंप चे वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी क्षयरोग विभागाचे कर्मचारी जिल्हा पीपीएम समन्वयक कमलेश्वर आमोदेकर, डीपीएस दीपक नांदेडकर, एसटीएस,. मिलिद भोळे व वामन तडवी, प्रोग्राम असिस्टंट अजय चौधरी, एसटीएलएस मुजाहिद खान मणियार, टीबीएचव्ही श्री. नितीन बाविस्कर, श्री. दीपक गुरव, ज्ञानेश्वर वाणी, भुषण पवार, फार्मेसिस्ट सुजाता माळी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील, डॉ. विजय घोलप, डॉ. मनिषा उगले, डॉ. हेमलता नेवे, डॉ. सोनल कुलकर्णी, डॉ. पल्लवी पाटील व दवाखाना अधिक्षक अनुभा भट व आदी उपस्थित होते.