नवी दिल्ली ;- भारतातल्या एकूण बेरोजगारांपैकी सुमारे 83% हे तरूण बरोजगार आहेत आणि त्यांच्यातही सुशिक्षित बेरोजगार- माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे.
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन – ILO आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन डेव्हलपमेंटने प्रसिद्ध केलेल्या भारतातल्या रोजगाराच्या परिस्थितीविषयीच्या या अहवालात भारतातील रोजगार आणि बेरोजगारीसंदर्भातली महत्त्वाची निरीक्षण नोंदवण्यात आलेली आहेत. भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांच्या हस्ते ‘इंडिया एम्प्लॉयमेंट 2024’ हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.