वरणगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

शहरात शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या शाळकरी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

शनिवार दि २५ रोजी सकाळी अकारा वाजेच्या सुमारास दोन अल्पवयीन मुली शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना, संशयीत आरोपी रमेश चंद्रकांत पाटील (४०), संतोष जानकिराम कोलते (४०) दोघे रा. विठ्ठल मंदिराजवळ विल्हाळा. यांनी सादर मुलींचा हात धरून “आमच्या सोबत चल” असे म्हणून त्यांना लजा वाटेल असे कृत करून विनयभंग केला. यापूर्वीही मागील सात ते आठ दिवसांपासून संशयीत आरोपी पिडीत मुलींचा रस्ता अडवून तिची छेड काढत होते.

या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादी नुसार दोघांवर भा.द.वी कलम ३५४, ३५४ (ड) ८ / १२ पोक्सो प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास स.पो.नि आशिष आडसुळ करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.