नगर परिषद स्थलांतर विरोधी कृतीसमीतीचे पोलीसांना निवेदन…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

गावातील नगरपरिषदेच्या कार्यालयाचे नवीन व्यापारी संकुल इमारतीमधे स्थलांतर करू नये. या मागणीसाठी नागरिकांनी एक समिती स्थापन केली आहे. त्या समितीने ११ जुलै रोजी मोर्चा काढण्याची परवानगी मागणारे निवेदन वरणगाव पोलीसांत दिले आहे.

या बाबतची माहिती अशी की, वरणगाव नगर परिषदेचे कार्यालय गावामध्ये आहे. परंतु ते कार्यालय रेल्वे स्टेशन परिसरातील विश्राम गृहातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत बाधण्यात आलेल्या व्यापारी संकुलात स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याची कुणकुण येथिल सर्व पक्षीय राजकिय पदाधिकारी व नागरीकांना लागताच कृती समीति स्थापन करण्यात आली होती. त्यांनी ५ जुन रोजी मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली व नगर परिषद कार्यालय जुन्याच इमारतीत राहु द्यावे अशी मागणी केली होती. तसे न झाल्यास दि ११ जुलै मंगळवार रोजी कृती समितीसह गावकऱ्यां तर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासंदर्भात मंगळवारी मोर्चा काढण्यात येणार असुन त्या आशयाचे निवेदन नगर परिषदेचे स्थलांतर करण्यास विरोध करणाऱ्या कृती समीती तर्फे दि ७ जुलै रोजी वरणगाव पोलीस स्टेशनला देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.