यावल ;- जंगलात अवैधरित्या वृक्षांची कत्तल करीत असतांना आढळुन आलेल्या एकाने कारवाईस गेलेल्या महिला वनकर्मचारी यांना शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असुन याबाबत त्या वृक्षतोड करणार्या व्याक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात वन विभागाच्या सुत्रांकडून मिळालेला माहिती अशी की,दिनांक २६फेबुवारी रोजी कर्मचारी यांचे पथक बोरमळी सह नियतक्षेत्र मेलाने मधील कक्ष क्रमांक २१६ या भागात वन जंगल क्षेत्रात गस्त करीत होते. याप्रसंगी राजेंद्र डकार्या पावरा हा कक्ष क्रमांक २१६ या भागात अवैधरित्या राखीव वनात अप प्रवेश करुन नव्याने झाडे तोडून जागा साफ सफाई करतांना दिसून आला. त्यास वनरक्षक मेलाने यांनी अवैध वृक्षतोड करण्यास मनाई केली असता त्याने महीला कर्मचारी यांची शर्टची कॉलर पकडली व त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन,पसार झाला.
सदरच्या घटनेबाबत महीला वनरक्षक यांनी सर्व घटना वरिष्ठ अधिकारी यांना कळवली असता संशयीत आरोपी राजेन्द्र डकार्या यांनी सागाचे एकूण २७ वृक्ष व इंजायली ३१ असे एकूण ५८ घ.मी३ .९३६ असून तोडलेल्या वृक्षांचे वनरक्षक यांनी मोजमाप घेतले व अनुक्रमे ०१ ते ५८ असे नंबर देऊन त्यांच्याकडील असलेला बिटाचा जप्त शिक्का उमटविला. तसेच जागेवर असलेल्या साग गोल नग एकूण ४० व इंजायली ४४ असे एकूण ८४ नग घ.मी २.१७७ असून नगांचे मोजमाप घेऊन वनसेवकांच्या मदतीने मुद्देमाल हा जप्त करण्यात येवुन शासकिय वाहनाने वाहतुक करुन डेपोत पावतीने जमा केला आहे
सदरच्या घटने बाबत ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथे जाऊन महीला कर्मचारी व अधिकारी यांनी सदर घटनेबाबत माहीती दिली असता नामे राजेंद्र डकार्या पावरा रा. मेलाने ता. चोपडा यांच्या विरोधात अवैध वृक्षतोड व महीला कर्मचारी यांच्याशी अश्लील भाषेत भाष्य करून जीवे मारण्याची धमकी दिली तरी याबाबत म.ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथे गुन्हा नोंदवण्यात आला.
सदरची कार्यवाही ही जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव, तसेच प्रथमेश हाडपे सहाय्यक वनसंरक्षक चोपडा/ यावल व गोपाल बडगुजर वनपरिक्षेत्र अधिकारी देवझिरी यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली आहे. यांच्या मार्गदर्शनाने सदरील फरार आरोपी यांच्या विरोधात ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथे गून्हा नोंदवण्यात आला.
तरी यावल विभागाचे उपवनसरंक्षक जमीर शेख वनविभाग जळगांव व प्रथमेश हाडपे सहाय्यक वनसंरक्षक चोपडा/ यावल यांच्या कडून जनतेस आवाहान करण्यात येते की अवैध वृक्षतोड, वन वणवा, शिकार, अतिक्रमणं, अवैध वाहतूक यांसारखे गुन्हे जर निदर्शनास आलें तर वनविभागाच्या टोल फ्री नंबर १९२६ वर तात्काळ संपर्क साधावा तसेच जवळच्या वनक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन वन विभागाच्या कडून करण्यात आले आहे