२००० रुपयांच्या नोटा यापुढे चलनात कायम राहणार

0

मुंबई – देशात २००० रुपयांच्या नोटा यापुढे चलनात कायम राहणार असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे १९ मे २०२३ रोजी २००० रूपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला होता.

तेव्हापासून आत्तापर्यंत २००० रूपयांच्या एकुण ९७.६२% नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत.

दिनांक १० मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या ३.५६ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. हा आकडा २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ८४७० कोटीपर्यंत घसरला आहे. २००० रुपयांच्या नोटा यापुढेही चलनात कायम राहतील, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.