मोठा निर्णय ! UPI ने 5 लाखांपर्यंत पेमेंट करता येणार, पण..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

तुम्ही देखील युपीआय म्हणजेच GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe सारख्या अॅप्सद्वारे पैशांचा व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे.

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी UPI द्वारे व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, UPI द्वारे पेमेंटची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. पण यासाठी एक ठेवण्यात आली आहे. ती म्हणजे हे व्यवहार फक्त शैक्षणिक संस्था आणि हॉस्पिटलमध्ये करता येतील.

दरम्यान प्रत्येक युझर UPI द्वारे एका दिवसात फक्त 1 लाख रुपयांचा व्यवहार करू शकतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.