Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»RBI च्या मोठ्या निर्णयामुळे शेअर बाजारात उसळी
    राष्ट्रीय

    RBI च्या मोठ्या निर्णयामुळे शेअर बाजारात उसळी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 8, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पतविषयक धोरणाचा निर्णय घेतल्याने आज शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. आज निफ्टी ५० ने नवीन विक्रमी उच्चांक गाठत इतिहास रचला. निफ्टी आज पहिल्यांदाच २१ हजारांवर गेला. आरबीआयने रेपो रेट ६.५० टक्के एवढा कायम ठेवला आहे. या RBI च्या पतधोरण समितीच्या घोषणेच्या काही सेकंद आधी निफ्टी ५० ने पहिल्यांदाच २१ हजारांवर जात उच्चांक गाठला.

    आरबीआयने केलेल्या घोषणेनंतर निफ्टी ८७ अंकांनी वाढून २०,९८९ वर व्यवहार करत होता. तर सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढून ६९,८३३ वर व्यवहार करत आहे. ३० स्टॉक्सच्या सेन्सेक्सनेही आरबीआयच्या पतधोरण घोषणेपूर्वी ६९,८८८ अंकांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.

    सेन्सेक्सवर जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, एचसीएल टेक, इंडसइंड बँक, एलटी, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स हे शेअर्स वाढले. तर एम अँड एम, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, मारुती हे शेअर्स घसरले आहेत.

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतविषयक धोरण समितीने सलग पाचव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट ६.५० टक्के एवढा कायम ठेवला आहे. याबाबतचा निर्णय आज शुक्रवारी (दि. ७) आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी जाहीर केला. आरबीआयच्या या निर्णयामुळे गृहकर्ज आणि इतर कर्जांच्या हप्त्यावर परिणाम होण्याची शक्यती कमी आहे. यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.

    EMI New Delhi rbi RBI Monetary Policy Share Market
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    ७१७ सरकारी दारूची दुकाने तातडीने बंद करा!

    May 12, 2026

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली सक्रिय

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif